सफरचंदाचा मुरंबा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

सफरचंदाचा मुरंबा | Safarchandacha Muramba

सफरचंदाचा मुरंबा - [Safarchandacha Muramba] जीवनसत्व अ, फायबरयुक्त असा ‘सफरचंदाचा मुरंबा’ हा हृदयरोगाच्या व्यक्तींना फायदेशीर आहे.

जिन्नस


  • १ किलो सफरचंद
  • १ कि. साखर
  • २ चमचे मीठ
  • २ लिंबाचा रस
  • आवश्यकतेनुसार पाणी

पाककृती


सफरचंद सोलून त्यांचा मधला भाग व बी काढुन टाकावे. साखरेत थोडेसे पाणी व लिंबाचा रस टाकुन एकतारी पाक बनवावा.

सफरचंद पाण्यातुन काढावे व पुसून पाकात टाकावे आणि नरम झाल्यावर पाकासहित काचेच्या बरणीत भरावे.

हा मुरंबा हृदयाच्या रोग्यांना फायदेशीर आहे.