साबुदाण्याची लापशी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

साबुदाण्याची लापशी

साबुदाण्याची लापशी - [Sabudanyachi Lapshi] पचायला हलकी आणि मऊसर अशी ही ‘साबुदाण्याची लापशी’ न्याहारी म्हणुन उत्तम पर्याय आहे.

जिन्नस


  • १ टेबलस्पून साबुदाणा
  • १ कप दूध
  • २ चमचे साखर

पाककृती


साबुदाणा थोडा वेळ धुवून ठेवावा. नंतर १/२ कप पाण्यात शिजवून घ्यावा. वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे.

नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे.

मग खाली उतरवून गार किंवा गरम, आवडीप्रमाणे लापशी द्यावी.

आयत्या वेळी त्यात चिमूटभर मीठ टाकल्यास ही लापशी खूप छान लागते.