MarathiMati.com - Android App on Google Play Store

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या | Sabudana Bhagar Batata Chaklya

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या - [Sabudana Bhagar Batata Chaklya] साबुदाणा, भगर, बटाटे घालून तयार केलेल्या चकल्या उन्हात वाळवून तळून उपवासालाही खाता येतील.

जिन्नस


  • दोन वाट्या भगर
  • चार वाट्या साबुदाणा
  • आठ मध्यम आकाराचे बटाटे
  • चवीप्रमाणे तिखट
  • मीठ
  • जिरे
  • साखर
  • तीन चमचे लोणी

पाककृती


रात्री साबुदाणा कोमट पाण्यात भिजवून ठेवावा. सकाळी बटाटे उकडून घ्यावे. थंड झाल्यावर सोलावे.

साधारणपणे तीन लिटर पाणी उकळत ठेवावे. त्यातील थोडे पाणी काढून बाजूला ठेवावे.

भगर स्वच्छ धुवून रोळून उकळत्या पाण्यात टाकावी. भगर थोडी शिजली म्हणजे त्यात साबुदाणा टाकावा.

भगर व साबुदाणा शिजत आल्यावर त्यात बटाटे किसून पसरत घालावे. हे मिश्रण सारखे ढवळून त्यात शिजत असतानाच तिखट, मीठ, जिरे, साखर व लोणी टाकावे.

जर मिश्रण घट्ट वाटते तर काढून ठेवलेले पाणी हबका मारून पातेल्यावर झाकण ठेवावे.

गॅस मध्यम ठेवून पाच-सहा वाफा काढाव्या. चकलीच्या पिठासारखे घट्ट मिश्रण झाले की खाली उतरून ठेवावे.

चकलीच्या साच्यात आतून पाणी व तुपाचा हात लावून पाण्याच्या हाताने थोडे थोडे मिश्रण मळून घेऊन साच्यातून चकल्या काढाव्यात.

प्लास्टिकवर त्या उन्हात वाळवाव्यात. तीन/चार उन्हे दाखवून हवाबंद डब्यात भराव्या.

तेल किंवा तुपात तळल्यास खूप खुसखुशीत व चविष्ट होतात.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store