गुलाबाचे सरबत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २००८

गुलाबाचे सरबत

गुलाबाचे सरबत - [Rose Sarbat] ‘क’ जीवनसत्वयुक्त ‘गुलाबाचे सरबत’ हे उष्णता आणि थकवा घालविणारे शरीरात थंडावा ठेवणारे उन्हाळ्यामध्ये याचा अवश्य उपयोग होईल.

जिन्नस


  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • १/२ लहान चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • १/४ लहान चमचा रासबेरी रेड रंग
  • १/२ चमचा रोझ इसेंस

पाककृती


प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी टाकून त्यात १/२ चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे.

सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवावे.

गार झाल्यावर त्यात रंग व इसेंस टाकावा व गाळून बाटलीत भरावे.

सरबत देताना पाव भाग तयार केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे.