रव्याचा केक (अंड्याशिवाय)
Ravyacha Cake (Eggless)
साहित्य :
- दीड वाटी रवा
- १ वाटी दूध
- १ वाटी दही
- १ वाटी साखर
- ४ वेलदोडे (पूड)
- ४ काजू ( पातळ काप)
- १० बेदाणे
- ८-१० चारोळ्या (ऐच्छिक)
- अर्धा चमचा बेकिंग सोडा
- १ वाटी लोणी किंवा तूप
- २-३ थेंब केशर एसेन्स किंवा रंग
- पाव चमचा मीठ.
कृती :
दही व साखर मिसळून घ्यावे. साखर विरघळली की नंतर त्यात दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून चांगले मिसळावे. तासभर झाकून ठेवावे.
नंतर तुपाचा पातळ हात सारवलेल्या भांड्यात मिश्रण ओतावे. मध्यम गरम ओव्हनमध्ये अर्धा तास ही केक भाजावा. गार झाल्यानंतर खावा.





