राजमा मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

राजमा मसाला

राजमा मसाला - [Rajma Masala] उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी ‘राजमा मसाला’ ही पंजाबी डिश भाताबरोबर छान लागते.

जिन्नस


 • ५०० ग्रॅम राजमा
 • १ कप ताजे दही
 • ३ कांदे
 • ३ इंच आले
 • ४ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा धणे पावडर
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा तिखट
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • २ चमचे क्रीम
 • तीन चमचे तेल
 • मीठ
 • कोथिंबीर

पाककृती


राजमा रात्र भर पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यात चिमूटभर सोडा मिसळा.

याच पाण्यात सकाळी राजमा उकळा. नंतर पाणी काढून टाका.

पातेल्यात तूप गरम करा. त्यात आले. कांदा, हिरवी मिरची गरम करा.

आता त्यात दही आणि राजमा टाका. थोडा वेळ भाजा नंतर पाणी टाकून उकडा.

एक दोन उकळ्या आल्यावर गरम मसाला व क्रीम टाका.

कोथिंबीर टाकून चूली वरून उतरून घ्या.