पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

पुरणाची पोळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २००८

पुरणाची पोळी

पुरणाची पोळी - [Puranachi Poli] सण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागते.

जिन्नस


  • अर्धा किलो चणा डाळ
  • अर्धा किलो गूळ
  • अर्धा किलो कणीक
  • १ वाटी तेल
  • अर्धा चमचा मीठ
  • वेलची किंवा जायफळाची पूड
  • पाव किलो तांदूळ पीठ

पाककृती


डाळ २ तास भिजत घालावी. कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी.

शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी (कट) काढून उरलेले पाणी निघून जाईपर्यंत चांगली परतावी.

नंतर त्यात किसलेला गूळ घालून त्याचे पाणी होऊन ते आटेपर्यंत कोरडी करावी व पुरणयंत्रात घालून वाटावी.

वाटतानाच ७-८ वेलचीची पूड किंवा जायफळाची पूड घालावी.

त्यानंतर कणीक मैद्याच्या चाळणीने चाळून त्यात अर्धा चमचा मीठ व १ पळीभर तेल घालून कणीक सैल भिजवावी. ती भिजवून झाल्यावर त्यात थोडे तेल घालून मळावी.

लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारखा करून त्यात वाटलेल्या पुरणाचा गोळा घालून तांदळाच्या पिठावर लाटावी व मंद आचेवर भाजावी.

कटाच्या आमटीसोबत वाढावी.

पुरणाची पोळी - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे


Book Home in Konkan