पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

पुलाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

पुलाव

पुलाव - [Pulao] पनीर, मटार, बीन्सचे तुकडे आणि वाटण्याच्या मसाल्यामुळे बनलेला पुलाव चवीला चटपटीत लागतो.

जिन्नस


 • दीड वाटी तांदूळ
 • अर्धी वाटी पनीर
 • अर्धी वाटी मटारदाणे
 • अर्धी वाटी गाजराचे तुकडे
 • अर्धी वाटी बीन्सचे तुकडे
 • १ मोठा कांदा
 • २ हिरव्या मिरच्या
 • अर्धा चमचा शहाजिरे
 • अर्धी वाटी ओले खोबरे
 • दीड चमचा साखर
 • चवीनुसार मीठ
 • तूप

वाटणाचा मसाला


 • ६ लसूण पाकळ्या
 • २ मोठे चमचे धने
 • २ चमचे खसखस
 • २ मोठे चमचे ओले खोबरे
 • १ मोठा चमचा जिरे
 • १ इंच आले
 • ३ सुक्या मिरच्या
 • ४ वेलदोडे

पाककृती


तांदूळ व भाज्या वेगवेगळ्या शिजवून घ्याव्यात. अर्धी वाटी खोबऱ्यात दोन वाट्या पाणी घालून मिक्सरमध्ये घुसळावे व गाळून घ्यावे. मिरच्या व कांदा उभ्या चिरावा.

एका मोठ्या पातेल्यात ३ चमचे तूप तापवावे. त्यात शहाजिरे, मिरच्याचे तुकडे, कुस्करलेला पनीर, भात, भाज्या व मीठ घालून जरा परतावे. नीट मिसळले की बाजूला ठेवावे.

वाटणाचा मसाला बारीक वाटून ठेवावा. दुसऱ्या पातेल्यात तूप तापले की त्यावर कांदा सोनेरी रंगावर परतावा. त्यावर वाटलेला मसाला परतावा.

त्यावर मीठ, साखर व नारळाचे गाळलेले दूध घालावे.

मंद आंचेवर दहा मिनिटे उकडू द्यावे. त्यात भाताचे मिश्रण घालावे व नीट ढवळून गरमगरम भात कोणत्याही करीबरोबर वाढावा.

Book Home in Konkan