MarathiMati.com - Android App on Google Play Store

कोळंबीचा पुलाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

कोळंबीचा पुलाव

कोळंबीचा पुलाव - [Prawns Pulao] महाराष्ट्रातील एक मांसाहारी भाताचा प्रकार ‘कोळंबीचा पुलाव’ हा चवीला सुंदर लागतो.

जिन्नस


  • १ वाटी साफ केलेली कोळंबी
  • १ वाटी मटारचे दाणे
  • ३ वाट्या बासमती किंवा दिल्ली राईस
  • २ कांदे
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • हळद
  • ४ लवंगा
  • ४ वेलदोडे

मसाला वाटण


  • २ चमचे धणे
  • २ चमचे खसखस
  • १ चमचा शहाजिरे
  • १०-१२ काळी मिरे
  • २-३ दालचिनीचे तुकडे
  • १०-१२ लाल मिरच्या
  • १०-१५ काजू

पाककृती


लसूण बारीक वाटून घ्यावी. नंतर थोडीशी हळद व वाटलेली लसूण कोळंबीला लावून ठेवावी.

कांदा चिरुन घ्यावा व मसाला बारीक वाटून घ्यावा.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून लवंग-वेलदोड्याची फोडणी करावी. नंतर त्यात मटारचे दाणे व कोळंबी घालून जरा परतावे.

नंतर त्यात २-३ तास अगोदर धुतलेले तांदुळ घालून परतावे. तांदुळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मीठ व वाटलेला मसाला घालावा.

नंतर मंदाग्नीवर भात शिजू द्यावा.

पुलाव तयार झाल्यावर त्यावर एक चमचा साजूक तूप घालावे व एका लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावा.

भाताला खाण्याच्या रंगात टाकून रंगीत कोळंबी पुलाव बनवू शकता आणि हा दिसायलाही सुंदर दिसतो.

MarathiMati.com - Android App on Google Play Store