MarathiMati.com - Official WhatsApp Number

पोळ्यांचा चुरमा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

पोळ्यांचा चुरमा

पोळ्यांचा चुरमा - [Poli Churma] दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर जर काही पोळ्या किंवा भाकरी शिल्लक राहिल्या असतील तर त्यातुन ही एक खमंग पाककृती बनवली जाऊ शकते.

जिन्नस


  • ५-६ पोळ्या (चपात्या/भाकर्‍या)
  • १ कांदा
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • १ चमचा साखर
  • कडीपत्ता
  • जीरे
  • मोहरी (फोडणीसाठी)

पाककृती


पोळ्यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल.) त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे.

कांदा बारीक चिरावा. पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जीरे. मोहरीची फोडणी द्यावी. नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.

कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये सर्व चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा. वरुन साखर व बारीक चिरुन कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २-३ मिनीटे शिजवावे व गरमागरम वाढावे.

पोळ्या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त्यामूळे शिल्लक पोळ्या टाकून द्याव्या लागत नाहीत.

ह्यात तुम्ही शेंगदाणे ,शिल्लक भात किंवा इतर आवडीच्या वस्तू घालून चव वाढवू शकता.

Book Home in Konkan