पियुष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

पियुष

दही घालून केलेले गोड पियुष (Piyush) हे उष्णता घालविण्यासाठी उन्हाळ्यातील अत्यंत उपयुक्त असे पेय आहे.

जिन्नस


  • ४ वाट्या गोड ताजे दही
  • १०० ग्रॅम साखर
  • किंचित लिंबाचा रस
  • जायफळ पूड
  • केशर

पाककृती


प्रथम दही साखरेसह मिक्सरमधून घुसळून घ्यावे.

त्यात किंचित लिंबाचा रस, जायफळाची पूड व केशर घालून चांगले घुसळून घ्यावे.

हे पियुष ४ जणांना पुरेल.

सर्व्ह करताना त्यात बर्फाचा खडा टाकावा.