अननस थंडाई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जानेवारी २००८

अननस थंडाई

अननस थंडाई - [Pineapple Thandai] मॅंगनीझ, व्हिटामिन क (सी) गुणांनी युक्त अशी ‘अननस थंडाई’ उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त असं थंडपेय आहे.

जिन्नस


  • १ वाटी अननसाचे चौकोनी तुकडे
  • अडीच कप अननसाचे सरबत
  • १०० ग्रॅम बदाम
  • ३ मोठे चमचे खसखस
  • ६ मोठे चमचे साखर
  • बर्फाचा चुरा

पाककृती


खसखस दहा ते बारा तास आधी भिजवून ठेवावी. बदामाची साले काढून घ्यावी.

५० ग्रॅम बदाम व खसखस वाटून घ्यावी. उरलेल्या ५० ग्रॅम बदामाचे पातळ-जाड काप करून घ्यावे.

वाटलेल्या मिश्रणात पाच ग्लास पाणी घालून ते गाळून घ्यावे.

पाण्यात अननसाचे सरबत व साखर घालून हे मिक्सरमधून काढावे.

त्यात अजून १ ग्लास पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे व आयत्या वेळी अननसाचे तुकडे व बर्फाचा चुरा घालून अननस थंडाई पिण्यास घ्यावी.