MarathiMati.com - Android App on Google Play Store

फीरनी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

फीरनी

तांदळाचा रवा बनवून त्यात दूध, साखर, सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे फीरनी (Phirni) ही सणासुदीला किंवा जेवणानंतर पुडींग म्हणून खाता येईल.

जिन्नस


  • १ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ
  • ४ वाट्या दूध
  • १ वाटी (भरून) साखर
  • २ चमचे चारोळ्या व काजूचे कप
  • १ चमचा बेदाणा

पाककृती


तांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावे.

दुध तापत ठेवावे. साय काढू नये. दुध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.

आंच मध्यम ठेवावी व सतत ढवळत राहावे. अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.

बोटाने कणी पहावी किंवा चाखून पाहावा. रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.

मिश्रण पुन्हा थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत चुलीवर ठेवावे व ढवळावे.

घट्ट होऊ लागले की शोभिवंत भांड्यात ओतावे त्यात वेलचीपूड किंवा एसेन्स घालावा.

गार झाले की चारोळ्या, काजू, बेदाणा घालावा. सुका मेवा नसला तरी चालेल.

फ्रीजमध्ये ठेवून थंड करावी व पुडिंग म्हणून जेवणानंतर लहान बॉलमधे द्यावी.

खास प्रसंग चांदीचा वर्ख किंवा देशी गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवावे.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store