MarathiMati.com - Android App on Google Play Store

पेरूची कोशिंबीर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

पेरूची कोशिंबीर | Peruchi Koshimbir

पेरूची कोशिंबीर - [Peruchi Koshimbir] TEXT

जिन्नस


  • ३-४ मोठे दळदार पिकलेले पेरू
  • ३-४ मध्यम बटाटे
  • २-३ पातीसह कांदे
  • ३ हिरव्या मिरच्या
  • ४-५ कोथिंबिरीच्या काड्या
  • ४-५ पुदिनाच्या काड्या
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा साखर

पाककृती


बटाटे उकडून सोलावे, बटाटे, कांदे, पात, मिरच्या, कोथिंबीर व पुदिन्याची पाने बारीक चिरावी.

पेरूच्या बियांचा भाग टाकून द्यावा. साल काढून टाकून गर बारीक चिरावा.

सर्व एकत्र अलगद मिसळावे. मीठ व साखर घालावी. लिंबाचा रस पिळावा व गार करून ही कोशिंबीर खायला द्यावी.

उपवासासाठी करायची असल्यास पुदिना व कांदे वगळावे. त्याऐवजी अर्धा चमचा जिरेपूड घालावी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store