MarathiMati.com - Android App on Google Play Store

पाणी पुरी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

पाणी पुरी

जिन्नस


  • ६-७ मोठे कप पाणी
  • थोडासा पुदिना
  • लिंबाएवढी चिंच
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • लहानसा आल्याचा तुकडा
  • १ चमचा जीरे
  • २-३ लवंगा
  • १/४ चमचा मिरपूड
  • थोडे लाल तिखट
  • थोडा गूळ
  • मीठ
  • १/२ लिंबाचा रस

सारणासाठी

  • १ वाटी मोड आलेले हळद घालून वाफवलेले मूग
  • २-३ उकडलेले बटाटे

पाककृती


चिंचेचा कोळ तयार करुन घ्यावा. मिरच्या, आले, पुदिना, जीरे, लवंगा, मिरपूड, तिखट, मीठ ह्यांची बारीक चटणी करुन घ्यावी.

नंतर वाटलेली चटणी, चिंचेचा कोळ व गूळ एकत्र करावे. ह्या पाण्यात लिंबाचा रस घालावा. चांगली चव येते.

प्रत्येक पुरी वरच्या बाजूने थोडी फोडून त्यात ८-१० मूग व थोडा बटाट्याचा चुरा भरुन व वरील पाण्यात बुडवून प्लेट्स तयार कराव्यात. लगेचच खाव्यात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store