पनीर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २००८

पनीर

पनीर - [Paneer] दुधामध्ये लिंबाचा रस, व्हिनेगर घालून तयार केलेल्या पौष्टिक पनीरची वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे आणि वेगवेगळी पाककृती आहेत.

मात्रा

  • ६०० ग्रॅम

जिन्नस


  • ३ लि. दूध
  • १० मिली. लिंबाचा रस किंवा व्हिनेगर

पाककृती


दूध उकळा व हलवत रहा. उकळी आल्यावर लिंबाचा रस किंवा विनेगर टाका.

लगेच दूध फाटेल व पाणी वेगळे होईल. पाणी गाळून वेगळे करा. राहिलेला गोळा कपड्यात बांधून लटकावून ठेवा.

सगळे पाणी निथरल्यावर उरेल तेच पनीर आहे. २-३ तास त्याला अति थंड पाण्यात ठेवा. नंतर कापून लहान-लहान तुकडे करुन घ्या.

तुमच्या आवडीची पनीरची भाजी बनवून खा.