MarathiMati.com - Android App on Google Play Store

पनीर टिक्का

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

पनीर टिक्का

पनीर टिक्का - [Paneer Tikka] चटपटीत आणि हॉटेलसारखी चव असलेला पनीर टिक्का घरच्या घरी बनवून खाऊ शकता.

जिन्नस


  • २०० ग्रा. पनीर
  • १०० ग्रा. दही
  • २५ ग्रा. मैदा
  • लसूण
  • आलं
  • १/२ चमचा जीरे पावडर
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १ मिली. ऑरेंज कलर
  • ५० ग्रा. बटर
  • ७५ ग्रा. टोमॅटो
  • ३० मिली. क्रीम
  • १/२ चमचा लाल मिरची
  • १/२ चमचा कसुरी मेथी
  • मीठ

पाककृती


दह्यामध्ये ऑरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा.

पनीरचे तुकडे तळावे, एका पातेल्यात लोणी टाकून त्यात आलं, लसूण टाकून २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे.

नंतर दही क्रीम टाकून भाजावे. त्याने तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाकावी.

पनीर बाउलमध्ये जमवावे. नंतर क्रीम व कोथिंबीर सजवावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store