MarathiMati.com - Android App on Google Play Store

पनीर रसमलाई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

पनीर रसमलाई

पनीर रसमलाई - [Paneer Rasmalai] मुळात बंगालचा असलेला ‘पनीर रसमलाई’ हा मध्यम गोड पदार्थ आहे जो आपल्याकडे सणासुदीला, लग्नकार्यात आणि विविध कार्यक्रमांत आवडीने बनविला जातो आणि लहान मुलांचा तर हा अतिषय आवडता पदार्थ आहे.

जिन्नस


  • १ लीटर दूध
  • ४ वाट्या साखर
  • १ कंडेन्सड मिल्कचा डबा
  • २ ते ३ कप सायीसकट दूध
  • ४-५ वेलदोड्याची पूड
  • थोडी केशराची पूड
  • १ टेबलस्पून मैदा.

पाककृती


१ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.

दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.

परातीत हे नासलेले दूध व मैदा ऐकत्र करुन खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.

एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा. पाकाला उकळी आली की त्यात वरील सोडा.

गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवा, गार होऊ द्या.

कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा. वेलदोड्याची पूड व केशर घाला. नंतर ह्या दुधात वरील गार झालेले गोळे सोडा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store