पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

पनीर बटर मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

पनीर बटर मसाला

पनीर बटर मसाला - [Paneer Butter Masala] मुळचा पंजाबी मात्र सर्वत्र प्रसिध्द असलेला पनीर बटर मसाला हा पनीर, बटर, कसुरी मेथी वगैरे पदार्थ घालून घरच्या घरी बनवला जाऊ शकतो आणि अगदी हॉटेल मध्ये मिळणार्‍या पनीर बटर मसाल्या सारखीच चव आपण घरी आणू शकता.

जिन्नस


 • १०० ग्रॅ. पनीर
 • ५० ग्रॅ. दही
 • २५ ग्रॅ. काजू
 • कोथिंबीर
 • मिरची
 • ५० ग्रॅ. लोणी
 • कसुरी मेथी
 • २ कांदे
 • २ टोमॅटो
 • जीरे
 • खडा मसाला
 • आले व लसणाची पेस्ट
 • सजावटीसाठी क्रीम
 • गरम मसाला टाकावा
 • मीठ

पाककृती


कांद्याला तळावे, पनीर तळावे, काजू दुधाने थोडे वाटून घेणे. मग टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा.

एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी.

नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी.

वरून पनीर, दही, कोथिंबीर व क्रीम टाकुन सजवावे.

Book Home in Konkan