MarathiMati.com - Android App on Google Play Store

पंचमेल सब्जी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जानेवारी २००८

पंचमेल सब्जी

पंचमेल सब्जी - [Panchmel Sabzi] पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करुन केलेली राजस्थानची प्रसिद्ध ‘पंचमेल सब्जी’ पोळी किंवा भाताबरोबर छान लागते.

जिन्नस


  • २५० ग्रॅम बटाटा
  • ४ वांगी
  • २०० ग्रॅम दूधी
  • १५० ग्रॅम वाटाणे
  • १ गड्डी कोथिंबीर
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • थोडासा गरम मसाला
  • धणे पावडर
  • लाल तिखट
  • काळी मिरी
  • मेथी दाणा
  • जीरे
  • कांदाच्या बीया
  • बडीशेप
  • १०० ग्रॅम दूध
  • लाल तिखट पावडर
  • तूप फोडणीसाठी

पाककृती


तूप कढईत टाकून फोडणी द्या. मसाले परतून झाल्यावर कोथिंबीर व मिरची चिरून टाका.

थोडा वेळ परतून सर्व भाज्या चिरून टाका. मीठ व बाकी मसाले टाकून परता.

भाजी थोडी शिजल्यावर दूध टाका. आता कढई झाकून भाजी शिजवा.

गॅस कमीवर ठेवा.

भाजी शिजल्यावर गरम मसाला टाकून परता व गरम गरम वाढा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store