NashikDiary.com

पंचामृत

Panchamrut

साहित्य :
  • १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या
  • १०-१२ पाने कढीलिंब
  • अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे
  • कोथिंबीर
  • सुक्या खोबऱ्याचे कातलेले १५-२० तुकडे
  • पाव वाटी तिळाचे कूट
  • पाव वाटी दाण्याचे कूट
  • अर्धा चमचा मीठ
  • अर्ध्या लिंबाएवढी चिंच
  • १ लिंबाएवढा गूळ
  • अर्धा चमचा गोडा मसाला
  • अर्धी वाटी तेल
  • फोडणीचे साहित्य
कृती :तेलावर दाणे व खोबऱ्याचे तुकडे अर्धवट तळून झाले की त्यात १ चमचा मोहरी, जिरे, हिंग,हळद, कढीलिंब, मिरच्याचे तुकडे घालून परतून घ्यावे.त्यात दीड भांडे पाणी घालून तिळाचे व दाण्याचे कूट घालावे.मीठ, चिंचेचा कोळ, मसाला, गूळ घालून उकळावे.उतरल्यावर कोथिंबीर घालावी.पंचामृत ५-६ दिवस चांगले टिकते.