पालक सूप

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

पालक सूप

पालक सूप - [Palak Soup] डोळ्यासाठी चांगले, आयर्नयुक्त आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक ‘पालक सूप’ स्टार्टरवेळी घ्यावे.

जिन्नस


  • ३ वाट्या बारीक चिरलेला पालक
  • १ मोठा कांदा
  • अर्धी वाटी मुगाची डाळ
  • २ कप दूध
  • चवीनुसार मीठ
  • मिरपूड

पाककृती


कांदा बारीक चिरावा. डाळ व पालक धुवावा.

तिन्ही एकत्र करून दोन कप पाणी घालून शिजवावे. चांगले घाटावे.

दूध घालून घुसळावे व सूपच्या गाळणीवर गाळून घ्यावे.

चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी.

प्यायला देताना पनीरचा चुरा, ब्रेडचे तळलेले तुकडे किंवा गाजराचा अर्धा चमचा कीस घालून सजवावे व गरमगरम पिण्यास द्यावे.