NashikDiary.com

पालक सूप

Palak Soup

साहित्य :

  • ३ वाट्या बारीक चिरलेला पालक
  • १ मोठा कांदा
  • अर्धी वाटी मुगाची डाळ
  • २ कप दूध
  • चवीनुसार मीठ
  • मिरपूड

कृती :

कांदा बारीक चिरावा. डाळ व पालक धुवावा. तिन्ही एकत्र करून दोनकप पाणी घालून शिजवावे. चांगले घाटावे. दूध घालून घुसळावे व सूपच्या गाळणीवर गाळून घ्यावे. चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी. प्यायला देताना पनीरचा चुरा, ब्रेडचे तळलेले तुकडे किंवा गाजराचा अर्धा चमचा कीस घालून सजवावे व गरमगरम पिण्यास द्यावे.