संत्र्याची बर्फी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २००८

संत्र्याची बर्फी

संत्र्याची बर्फी - [Orange Barfi] ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या ‘संत्र्याची बर्फी’ गोड पदार्थ म्हणून सणासुदीला करु शकता.

जिन्नस


  • ६ मोठी संत्री
  • ५०० ग्रॅम खवा
  • ५०० ग्रॅम साखर
  • १ संत्र्याची पाकवलेली साल
  • पिवळा रंग
  • थोडा केशरी रंग
  • ५-६ वेलदोड्यांची पूड.

पाककृती


संत्री मधोमध कापून दोन भाग करावे. नंतर आपण मोसंबीचा रस काढतो तसा रस काढवा.

खवा हाताने सारखा करावा.

साखरेत संत्र्याचा रस घालून गोळीबंद पाक करा. नंतर त्यात केशरी रंग, वेलची पूड व संत्र्याची कुटलेली साल घाला.

जरा ढवळून खाली उतरून घोटत राहा.

चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओतून थापा व वड्या पाडा.