नवरत्न पुलाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जानेवारी २००८

नवरत्न पुलाव | Navaratna Pulao

नवरत्न पुलाव - [Navaratna Pulao] नऊ प्रकारचे वेगवेगळे जिन्नस घालून बनवलेला पुलाव म्हणजे ‘नवरत्न पुलाव’ जो तुम्ही सणासुदीला तसेच पाहुणचार करण्यासाठी बनवू शकता.

जिन्नस


 • १॥ कप तांदुळ
 • १०० ग्रॅ. फ्रेंचबीन
 • १०० ग्रॅ. वाटाणे
 • १०० ग्रॅ. गाजर
 • ३ कांदे
 • ४ टे. तुप
 • अर्धा चमचा तिखट
 • छोटा अर्धा चमचा हळद
 • लसूण - आले पेस्ट
 • कोथिंबीर
 • १०० ग्रॅ. पनीर
 • थोडा कोबी
 • थोडे काजु, बेदाणे
 • तळण्यासाठी तूप
 • मीठ

पाककृती


पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तळावे. तांदळास वेगळे शिजवून घ्यावे. भाजीचे छोटे छोटे तुकडे करून उकळावे.

एका भांड्यात तूप गरम करून बारीक चिरलेला कांदा परतावा नंतर त्यात आले - लसूण पेस्ट, पनीर, भाज्या, ड्रायफ्रुट्स टाकावे व त्यात हळद, तिखट टाकून मिक्स करावे.

भातामध्ये सर्व मिश्रण, मीठ टाकून एकत्र करावे व थोड वेळ गरम करुन त्यावर लिंबू पिळून वाढावे.

उरलेले तळलेले पनीर, ड्रायफ्रुट्स व कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याने वरून सजवावे.