Download MarathiMati.com's New Android App from Google Play

नारळाची चटणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

नारळाची चटणी । Naralachi Chutney

नारळाची चटणी - [Naralachi Chutney] TEXT

जिन्नस


  • अर्ध्या नारळाचा चव(किसलेला नारळ)
  • पाव वाटी चणाडाळ
  • पाव वाटी उडीदडाळ
  • ६ हिरव्या मिरच्या
  • अर्धा चमचा मोहरीची पूड
  • १ वाटी दही
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे तेल
  • पाव चमचा मोहरी
  • एक अष्टमांश चमचा हिंग
  • १०-१२ कढीलिंबाची पाने
  • पाव चमचा हळद (घातली नाही तरी चालेल)

पाककृती


आदल्या रात्री दोन्ही डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. सकाळी उपसून ठेवाव्या.

तेल तापले की त्यावर मोहरी, हिंग व हळद घालून दोन्ही डाळी फोडणीस टाकाव्या. जरा ढवळून आंच कमी करावी व झाकण ठेवावे. अधूनमधून ढवळावे.

मिरच्या व कढीलिंबाची पाने चिरावेत. डाळी अर्धवट शिजल्या की त्यात मिरची-कढिलिंबाच्या पानांचे तुकडे घालावे. पुन्हा जरा परतून झाकण ठेवावे.

डाळी शिजत आल्या की त्यात खोबरे घालावे व दोनतीन मिनिटे परतावे. मीठ घालून ढवळावे व चटणी उतरवून गार होऊ द्यावी.

निवली की त्यात दही घालून कालवावी व वाढावी.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play