पाककला | Maharashtrian Recipes

नारळाची चटणी | Chutney Recipes

साहित्य :

अर्ध्या नारळाचा चव, पाव वाटी चणा डाळ, ६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मोहरीची पूड, १ वाटी दही, चवीनुसार मीठ, २ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, एक अष्टमांश चमचा हिंग, १०-१२ कढीलिंबाची पाने, पाव चमचा हळद (घातली नाही तरी चालेल)

 

कृती :

आदल्या रात्री दोन्ही डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. सकाळी उपसून ठेवाव्या. तेल तापले की त्यावर मोहरी, हिंग व हळद घालून दोन्ही डाळ फोडणीस टाकाव्या. जरा ढवळून आंच कमी करावी व झाकण ठेवावे. अधूनमधून ढवळावे. मिरच्या व कढीलिंब चिराव्या, डाळी अर्धवट शिजल्या की त्यात मिरची-कढिलिंबाचे तुकडे घालावे. पुन्हा जरा परतून झाकण ठेवावे. डाळी शिजत आल्या की त्यात खोबरे घालावे व दोनतीन मिनिटे परतावे. मीठ घालून ढवळावे व चटणी उतरवून गार होऊ द्यावी. निवाली की त्यात दही घालून कालवावी व वाढावी.

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.