Download MarathiMati.com's New Android App from Google Play

नागपुरी डाळीचे वडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ फेब्रुवारी २००८

नागपुरी डाळीचे वडे

नागपुरी डाळीचे वडे - [Nagpuri Daliche Vade] खमंग आणि चटपटीत असे मिश्र डाळी आणि मटकीपासून बनवलेले नागपुरी पद्धतीचे ‘नागपुरी डाळीचे वडे’ सर्वांना आवडेल.

जिन्नस


 • १ वाटी चणाडाळ
 • अर्धी वाटी मुगाची डाळ
 • पाव वाटी उडदाची डाळ
 • अर्धी वाटी मटकी
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • १ इंच आले
 • अर्धा चमचा हळद
 • चवीनुसार मीठ

फोडणीसाठी साहित्य

 • ५ चमचे तेल
 • ७-८ लाल मिरच्या
 • ४ टहाळे कढीलिंब
 • पाव चमचा हिंग
 • अर्धा चमचा हळद
 • तळण्यासाठी तेल

पाककृती


आदल्या रात्री डाळी व मटकी भिजत घालावी. सकाळी स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. पाणी निथळल्यानंतर भरडसर वाटावी व एकत्र मिसळावी. आले व हिरवी मिरची एकत्र वाटावी. लहान कढल्यात किंवा पातेलीत तेल तापले की त्यात लाल मिरच्या व कढीलिंबाची पाने चुरचुरीत होईपर्यंत परतावी.

त्यात हिंग व हळद घालून खाली उतरवावे. फोडणी गार झाली की मिरच्या व कढीलिंबाची पाने हाताने कुस्करावी व वाटलेल्या डाळीवर ही फोडणी घालावी. आले, मिरच्यांची गोळी, मीठ, अर्धा चमचा हळद व कोथिंबीर घालून मिश्रण हाताने कालवावे. त्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन वडा थापावा.

तेलात हे वडे मध्यम आंचेवर बदामी रंगावर तळावे. वरील प्रमाणात २५ ते ३० वडे होऊ शकतील. चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावेत.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play