Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मटण मोगलाई सालन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

मटण मोगलाई सालन

मटण मोगलाई सालन - [Mutton Mughlai Salan] नेहमीच्या मटण रस्यापेक्षा एक वेगळी चव म्हणुन तसेच पाहुणचाराला ‘मटण मोगलाई सालन’ करु शकता.

जिन्नस


 • अर्था किलो मटण
 • पाव किलो कांदे
 • ५-६ लाल मिरच्या
 • २ चमचे धणे
 • ५-६ मिरी
 • ३ वेलची
 • १ दालचिनी
 • १ इंच आले
 • ७-८ लसूण पाकळ्या
 • अर्धा चमचा हळद
 • तूप
 • मीठ
 • थोडे केशर
 • ५-६ बदाम

पाककृती


मटणाचे तुकडे करून धुवून घ्या. कांदे पातळ चिरून घ्या. मटणाला मीठ, हळद व धणेपूड चोळून ठेवा.

तूप तापवून त्यात मटण घालून मोठ्या आचेवर परतत रहा. मटण तांबूस झाले की, त्यात ३ कप उकळते पणी घालून घट्ट झाकण लावून मटण मऊ शिजवा.

तुपात कांदा परतून बदामी करून घ्या.

मटण शिजले की, त्यात कांदा घाला. वेलची, दालचिनी व ठेचलेली मिरी घाला.

जरूर वाटल्यास पाण्याचा शिपका मारून परतत रहा. थोडा वेळ परतवून त्यात २ टेबलस्पून गरम केलेले तूप सोडा.

बदाम दुधात वाटून घ्या. केशर थोड्या दुधात घोळून घ्या. मटणावर दोन्ही घालून एकत्र करून एक वाफ काढा.

हे मटणाचे सालन पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play