पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

मटार पनीर कबाब

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

मटार पनीर कबाब

मटार पनीर कबाब - [Mutter Paneer Kebab] चटपटीत असे ‘मटार पनीर कबाब’ हे न्याहारी किंवा मधल्या वेळेत खायला दिल्यास सर्वांच्याच आवडीचे होईल.

जिन्नस


 • २५० ग्रॅम मटार दाणे
 • २०० ग्रॅम पनीर
 • ५-६ ब्रेडचे स्लाईस
 • १ टे. स्पून खसखस
 • २ टे. स्पून कॉर्नफ्लोअर
 • लसूण पाकळ्या
 • १ कांदा
 • १ टी. स्पून गरम मसाला
 • पुदिन्याची पाने
 • तळण्यासाठी तेल
 • मीठ

पाककृती


मटार दाणे, पनीर आणि ब्रेडचे स्लाईसेस मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्यावेत.

हिरव्या मिरच्या, खसखस, लसूण, कांदा, पुदिन्याची पाने यांची पेस्ट बनवून घ्यावी.

वरील सर्व साहित्य, मीठ आणि गरम मसाला त्यात एकत्र करुन हे मिश्रण मळून घ्यावे.

या मिश्रणाचे जरा लांबट (अंडाकार) गोळे करुन ते कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून गरम तेलात लालसर तळून घ्यावेत.

आणि हे गरम गरम कबाब टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खायला द्यावेत.

Book Home in Konkan