मटार कचोरी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जानेवारी २०१८

मटार कचोरी प्रकार | Mutter Kachori

मटार कचोरीची पाककृती - [Mutter Kachori Recipe] न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाता येईल अशी चटपटीत मटार कचोरी घरच्या घरीच बनवा.

जिन्नस


  • २ वाट्या मैदा
  • १ वाटी बारीक रवा
  • १ किलो मटार
  • थोडीशी कोथिंबीर
  • ३ - ४ चमचे काजू अणि किसमीस
  • १०० ग्रॅम ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं
  • २५ ग्रॅम खसखस
  • १/२ चमचा लाल तिखट
  • ४ - ५ हिरव्या मिरच्या
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा गोडा मसाला
  • १ चमचा काळा मसाला
  • मीठ चवीनुसार
  • २ चमचे लिंबाचा रस
  • १/२ चमचा साखर
  • १ चमचा जीरे पावडर
  • १ चमचा धणे पावडर

पाककृती


  • प्रथम परातीत २ वाट्या मैदा घेवून त्यात १ वाटी बारीक रवा व ५ - ६ चमचे तेल व चवीपूरत मीठ घालून घट्ट भिजवून २ - ३ तास बाजूला ठेवा.
  • नंतर मटार सोलून मिक्सर मधून थोडे जाडसर वाटून घ्या. त्यात ४ - ५ हिरव्या मिरच्या घालून बारीक करा.
  • नंतर एका कढईत ४ - ५ चमचे तेल गरम करुन मोहरी, जीरे घाला नंतर त्यात भाजलेले खोबरे(किस) घालून थोडं परतून घ्या.
  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व हळद, तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, धणे पावडर व जीरे पावडर घालून परता. परतल्यावर त्यात मटारची भरड घाला व चांगले मिसळून घ्या. नंतर त्यात काजू, किसमीस घालून व आवडीनुसार साखर व चवीपूरते मीठ घाला. आता सारण तयार.
  • आता पिठाच्या गोल पुर्‍या लाटून त्यात मटार सारण घालून त्या बंद करून चपटे वडयासारखे करा.
  • कढईत तेल गरम करुन तयार कचोरी गुलाबी होईपर्यंत तळून घ्या.
  • स्वादिष्ट मटार कचोरी तयार. गरम गरम मटार कचोरी चिंचेच्या किंवा पुदीनाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.