MarathiMati.com - Android App on Google Play Store

मशरूम पुलाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २००८

मशरूम पुलाव | Mushroom Pulao

मशरूम पुलाव - [Mushroom Pulao] जीवनसत्व ‘ड’ असलेले मशरुम, भाज्या आणि पनीर युक्त असलेला ‘मशरूम पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी तसेच नेहमीच्या पुलावापेक्षा चव बदल म्हणून अत्यंत उत्तम पर्याय आहे.

जिन्नस


  • २ वाटी तांदूळ
  • १ डबा मशरूम
  • २५० ग्रॅम पनीर
  • ३ कांदे
  • २ ढोबळी मिरची
  • २ गाजर
  • १ लहान चमचा मीठ
  • १/२ लहान चमचा गरम मसाला
  • ५ चमचे तूप

पाककृती


तांदूळ धुऊन स्वच्छ करून तासभर भिजवा.

मशरूम धुऊन बारीक व लांब चिरुन घ्या. पनीर चौकोनी चिरुन तळून घ्या.

कांदा, ढोबळी मिरची, गाज्रर बारीक व लांब चिरुन घ्या.

एका पातेल्यात तूप गरम करा. कांदा टाकून परता.

कांदा गुलाबीसर झाल्यावर गरम मसाला, मीठ व मशरूम टाकून शिजवा. आता ढोबळी मिरची, गाजर व पनीर टाका.

तांदूळ टाकून ४ वाटी पाणी टाका व गॅस कमी करुन झाकून शिजवा. शिजल्यावर गरम-गरम वाढा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store