MarathiMati.com - Android App on Google Play Store

मुळ्याचा पराठा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जानेवारी २००८

मुळ्याचा पराठा

मुळ्याचा पराठा - [Mulyacha Paratha] खासकरुन मुळ्याची भाजी करताना वास येतो त्यामुळे कोणी खायला तयार नसते त्यामुळे तो वास घालवून चटपटीत करण्यासाठी ‘मुळ्याचा पराठा’ बनवून खाता येईल.

जिन्नस


  • २ ताजे किसलेले मुळे
  • १/२ चमचे लाल मिरची
  • १/२ चमचे वाटलेले अनारदाने
  • १ कांदा बारीक कापलेला
  • १ कापलेली हिरवी मिरची
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर
  • १ कप तूप तळणासाठी
  • २५० ग्रा. गव्हाचे पीठ
  • १ चमचा तूप पीठात मळण्यासाठी
  • मीठ चवीनुसार

पाककृती


पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.

मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे.

दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store