MarathiMati.com - Android App on Google Play Store

मलबारी मूर्गी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

मलबारी मूर्गी

मलबारी मूर्गी - [Mulberry Murgi] कांद्याची ग्रेव्ही, काजूसह वाटलेला मसाला असलेली चिकनची ही ‘मलबारी मूर्गीची’ पाककृती भाकरी, नान, पराठा किंवा गव्हाच्या रोटीसोबत रुचकर लागेल.

जिन्नस


  • १ किलो चिकन
  • १० काजू
  • ४ कांदे (बारीक चिरलेले)
  • १० लसणाच्या पाकळ्या
  • १ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • स्वादानुरूप मीठ
  • १ चमचा साखर
  • अर्धा कप नारळाचं दूध
  • १ चमचा लिंबाचा रस

मसाला


  • १० गोवा मिरच्या (गरम पाण्यात ठेवलेल्या)
  • १ चमचा हळद

पाककृती


काजूसकट सर्व गरम मसाला मिक्सरमधून वाटून घ्या.

पातेल्यात तूप तापवून त्यात लसूण व कांदा तांबूस रंगावर परतवून घ्या.

त्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.

त्यात वाटलेला मसाला व चिकनचे तुकडे घालून परतवा. त्यात हळद घालून चांगले परतवा. गॅस मंद ठेवा.

त्यात मीठ, साखर, नारळाचे दूध घाला व उकळी आल्यावर चिकन शिजत ठेवा.

त्यात लिंबूरस एकत्र करून खाली उतरवा.

चिकन शिजल्याची खात्री करून घ्या व मलबारी मूर्गी गरमागरम सर्व्ह करा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store