MarathiMati.com - Android App on Google Play Store

मुगलई दम आलू

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ११ जानेवारी २००८

मुगलई दम आलू

मुगलई दम आलू - [Mughlai Dum Aloo] उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता.

जिन्नस


  • ८ बटाटे
  • तळणासाठी तूप

भरण्यासाठी मसाला

  • ४ कापलेली काजू
  • ६ कापलेली मनुका
  • ११५ ग्रा. मावा
  • १ हिरवी मिरची
  • मीठ
  • काळे मिरे
  • २ कांदे
  • २ हिरवी मिरची
  • १ आल्याचा तुकडा
  • १/२ चमचा हळद
  • २ चमचे मीठ
  • ५ लाल मिरची
  • ५ पाकळी लसूण

पाककृती


बटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे. बटाट्याचा आतील भाग पोकळ करुन घ्यावा. बटाट्यामध्ये बनविलेला मसाला भरावा व उरलेल्या बटाट्याच्या कुस्कराने भरुन टाकावे.

टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे.

एका पातेल्यात तूप गरम करून लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी.

जेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत्या रसात तळलेले बटाटे टाकावे तसेच गरम-गरम वाढावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store