मुग डाळीचा हलवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २००८

मुग डाळीचा हलवा

मुग डाळीचा हलवा - [Moog Dalicha Halwa] मुळचा राजस्थानी असलेला सणासुदीला केला जाणारा गोड पदार्थ चवीला फार सुंदर लागतो.

जिन्नस


  • २ वाट्या मुग डाळ
  • २ वाट्या साखर
  • ३ वाट्या दूध
  • १ १/२ वाटी डालडा
  • १५० ग्रॅम खवा
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • २५ ग्रॅम बेदाणा
  • थोडा पिवळा रंग

पाककृती


मुगाची डाळ भिजत घालून वाटावी. नंतर वाटालेल्या डाळीत २ वाट्या दूध घालून कालवावे व तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपर्यंत परतावे.

मग त्यात रंग घालावा. नंतर साखर घालून मिश्रण जरा घट्ट झाले कि उतरावे.

नंतर त्यात बेदाणा व वेलचीपूड घालावी. खव्यामध्ये १ वाटी दूध घालून सारखा करावा व खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा.

आयत्या वेळी मुगाच्या डाळीच्या हलव्यात खवा घालून सर्व्ह करावे.