Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मिक्स व्हेजिटेबल लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २००८

मिक्स व्हेजिटेबल लोणचे

मिक्स व्हेजिटेबल लोणचे - [Mix Vegetable Pickle] वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊन त्यात मसाला टाकून चटपटीत मिक्स व्हेजिटेबल लोणचे घरच्या घरी तयार.

जिन्नस


  • १॥ किलो कोबी
  • १ कि. गाजर
  • १ किलो मटार
  • १॥ कि. शालजम
  • १०० ग्रा. लाल मिरची
  • १०० ग्रा. सरसो तेल
  • ५० ग्रा. हळद
  • २५० ग्रा. मीठ
  • १०० ग्रा. व्हिनेगर
  • २५० ग्रा. गूळ

पाककृती


सर्व भाज्या (मटार सोडुन ) धुवून मध्यम आकारात कापल्या त्यानंतर उकळल्या पाण्यात टाकाव्या व थोड्याशा शिजल्यानंतर उतरवून पाणी काढुन उन्हात सुकवाव्या.

नंतर सर्व मसाले वाटुन मिळवावे तसेच गुळास व्हिनेगरमध्ये टाकुन गरम करून तेलही त्यात मिळवावे.

सर्व वस्तु व्यवस्थित मिळवून बरणी मध्ये भरून उन्हात ठेवावे. चार दिवसात लोणचे तयार होईल.

यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरू शकता.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play