MarathiMati.com - Android App on Google Play Store

मिश्र डाळीचे वडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २००८

मिश्र डाळीचे वडे

मिश्र डाळीचे वडे - [Mix Daliche Vade] पोटभर न्याहारी तसेच सर्व जीवनसत्वयुक्त असे ‘मिश्र डाळीचे वडे’ घरच्या घरी तयार!

जिन्नस


  • १ वाटी तुरडाळ
  • १ वाटी हरभर्‍याची डाळ
  • १ वाटी उडदाची डाळ
  • १/२ वाटी मसुराची डाळ
  • मीठ
  • २ कांदे बारीक चिरून
  • हळद
  • मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • हिंग

पाककृती


सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात. ३/४ तासांनंतर बारीक वाटून घ्याव्यात.

नंतर त्यांत मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग हळद घालून चांगले कालवावे.

बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत.

कांदा न खाणार्‍यांनी कांद्याऐवजी कोबी घालावा किंवा खूप कढीलिंब बारीक चिरुन घालावा.

पालकचिरून ह्यात मिसळल्यासही छान लागतात. गाजरे किसून निम्म्या डाळीत घालावी व निम्म्या डाळीत इतर काही तरी भाज्या घालाव्यात.

पोट तर भरतेच, पण सर्व जीवनसत्वे ही मिळतात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store