MarathiMati.com - Android App on Google Play Store

मिक्स दाल पराठा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

मिक्स दाल पराठा | Mix Dal Paratha

मिक्स दाल पराठा - [Mix Dal Paratha] कणीक, रवा आणि वेगवेगळया प्रकारच्या डाळीचे पीठाचे चविष्ट पराठे सॉस किंवा चटणी सोबत न्याहारी किंवा डब्यात देता येतील.

जिन्नस


  • ३ वाट्या कणीक
  • १/४ वाटी बारीक रवा
  • मीठ
  • १/२ तेल
  • ओवा

सारणासाठी साहित्य

  • १/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ
  • १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट
  • तिखट
  • मीठ
  • अनारदाणा/आमचूर पावडर

पाककृती


कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.

नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.

तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.

आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.

हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store