पाककला | Maharashtrian Recipes

मिक्स भाजी रस्सा

Mix Bhaji Rassa

साहित्य :
  • लाल भोपळ्याचे वाटीभर तुकडे
  • दोन बटाटे
  • दोन रताळी
  • हिरव्या मिरच्या
  • थोडे जिरे
  • थोडे दाणेकूट
  • थोडा नारळ खव
  • चिरलेली थोडी कोथिंबीर
  • लवंगा दोन
  • थोडे तूप
  • चवीसाठी थोडा गूळ आणि थोडा चिंचकोळ
  • मीठ
कृती : रताळी, बटाटे स्वच्छ धुऊन साली काढून फोडी करून एक भांड्यात ठेवा. त्यात पाणी घाला. नारळ खव. मिरच्या, जिरे बारीक वाटून घ्या. गरम तुपात हे वाटण परता. वाटण बाजूला काढून ठेवा. त्याच भांड्यात उरलेले तूप गरम करा. त्यात लवंगा परता. परतल्यावर भाज्यांच्या फोडी त्यात घाला. चांगले लालसर परता. पाणी घालून झाकण ठेवून शिजवा. मऊसर शिजल्या की त्यात वाटण,थोडा गूळ व चिंचेचा कोळ, मीठ घाला. परत परता. रस्सा जसा हवा त्यानुसार पाणी घाला. शिजल्यावर वरून चिरलेली कोथिंबीर पेरा. रस्साभाजी तयार.
Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony