मिश्रडाळींचे वडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ फेब्रुवारी २००८

मिश्रडाळींचे वडे

मिश्रडाळींचे वडे - [Nagpuri Daliche Vade] सर्व प्रकारच्या डाळींपासून बनविलेले पौष्टिक, चटपटीत असे ‘मिश्रडाळींचे वडे’ सर्वांना आवडेल.

जिन्नस


 • १ वाटी चणा डाळ
 • १ वाटी मुगाची डाळ
 • १ वाटी उडदाची डाळ
 • अर्धी वाटी तुरीची डाळ
 • अधी वाटी मसुराची डाळ
 • २ सें.मी. आल्याचा तुकडा
 • ७-८ हिरव्या मिरच्या
 • १ वाटी ओल्या खोबर्‍याचा किस
 • १ वाटी चिरलेली कोथिंबीर
 • १ चमचा जिरे
 • २ चमचे मीठ
 • अर्धा चमचा गरम मसाला (असल्यास, नसला तरी चालेल)
 • तळण्यास तेल

पाककृती


सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. दोन तासानंतर पुन्हा स्वच्छ धुवाव्या व निथळाव्यात.

आले-मिरची-जिरे, व मीठ एकत्र वाटावे व डाळीही वाटून घ्याव्या. त्यात खोबरे, कोथिंबीर व मसाला घालावा.

जास्त तिखट हवे असल्यास थोडॆ लाल तिखट किंवा मिरेपूड घालावी. चमचाभर तेल घालून मिश्रण कालवावे. त्याचे छोटे गोल किंवा चपटे वडे करून तळावे.

चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावे