मिश्रडाळींचे वडे
Mishradaliche Vade
साहित्य :
- १ वाटी चणा डाळ
- १ वाटी मुगाची डाळ
- १ वाटी उडदाची डाळ
- अर्धी वाटी तुरीची डाळ
- अधी वाटी मसुराची डाळ
- २ सें.मी. आल्याचा तुकडा
- ७-८ हिरव्या मिरच्या
- १ वाटी ओल्या खोबऱ्याचा किस
- १ वाटी चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा जिरे
- २ चमचे मीठ
- अर्धा चमचा गरम मसाला (असल्यास, नसला तरी चालेल)
- तळण्यास तेल
कृती :
सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. दोनतासानंतर पुन्हा स्वच्छ धुवाव्या व निथळाव्यात. आले-मिरची-जिरे, व मीठ एकत्र वाटावे व डाळीही वाटून घ्याव्या. त्यात खोबरे, कोथिंबीर व मसाला घालावा. जास्त तिखट हवे असल्यास थोडॆ लाल तिखट किंवा मिरेपूड घालावी. चमचाभर तेल घालून मिश्रण कालवावे. त्याचे छोटे गोल किंवा चपटे वडे करून तळावे.
चटाणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावे





