पुदीना चटणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१८

पुदीना चटणी | Mint Chutney

पुदीना चटणी पाककृती - [Mint Chutney Recipe] सॅंडविच, समोसा, आलु टिक्की, ब्रेड पकोडा अशा चटपटीत पदार्थांसोबत आपण पुदीना चटणीचा आस्वाद घेऊ शकतो, एक वेळ नक्की करून पहावी अशी चटपटीत चटणी.

जिन्नस


 • अर्धी गड्डी पुदिनाची पाने
 • अर्धी गड्डी कोथिंबीर
 • छोटा तुकडा आलं
 • ७ - ८ पाकळ्या लसूण
 • ३ हिरव्या मिरच्या
 • १/२ टी. स्पून ओले खोबरे
 • २-३ काळी मिरी
 • चवीनुसार मीठ

पाककृती


 • पुदिन्याची पाने व कोथिंबीर धुवून बारीक कापा.
 • आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, काळी मिरी, मीठ व पुदीना व कोथिंबीर एकत्र करून मिक्सर मध्ये टाकून मऊसर पेस्ट बनवा.
 • आवडत्या डिशसोबत एन्जॉय करा.