MarathiMati.com - Android App on Google Play Store

मेतकूट

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

मेतकूट

मेतकूट - [Metkut] खिमटी भात, तूप आणि वरुन मेतकूट घातल्यानंतर येणारी चव दुसर्‍या कुठल्याच पदार्थास नाही, या मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाचा पावसाळ्यात आरोग्यासाठी फार फायदा होतो (दह्यातही मेतकूट घालून छान चव लागते).

जिन्नस


  • २५० ग्रॅम चणाडाळ
  • ५० ग्रॅम उडीद डाळ
  • मूठभर तांदूळ
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा जीरे
  • ८-१० लाल सुक्या मिरच्या
  • अर्धा इंच सुंठेचा तुकडा
  • १ चमचा हळद
  • १ चमचा हिंग

पाककृती


चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जीरे हे पदार्थ वेगवेगळे भाजावेत.

मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्यात.

सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद व हिंग हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.

दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या बाटलीत भरावे.

पावसाळ्यात मेतकुटाचा फार उपयोग होतो

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store