MarathiMati.com - Android App on Google Play Store

मेथी मटर मलाई

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

मेथी मटर मलाई

मेथी मटर मलाई - [Methi Mutter Malai] डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.

जिन्नस


  • १०० ग्रा. हिरवे मटार
  • २ चमचे मलाई
  • २ छोटे जुडी मेथी
  • ४ हिरवी मिरची
  • एक टोमॅटो
  • २ चमचे साखर
  • २ चमचे मावा
  • १ कप दूध
  • ४ चमचे वाटलेला पालक
  • थोडी हळद
  • २०० ग्रा. काजू
  • ५० ग्रा. खरबुज बी
  • २ कारले
  • ४ चमचे तेल
  • १०० ग्रा. मावा
  • ४ लवंग
  • ४ छोटी विलायची
  • ४ काळे मिरे
  • २ तेज पान
  • २ चमचे आले लसणाची पेस्ट

पाककृती


१ लि. पाण्यात काजू आणि खरबूज बी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावी. कढईत तेल टाकून लवंग, विलाईची, तेजपान काळीमिरे आणि आले लसणाची पेस्ट टाकून भाजावे. यात मावा टाकून व्यवस्थित मिळवावे.

१ ग्लास पाणी, काजू-खरबुज पेस्ट आणि एक कप दूध टाकावे. १०-१५ मिनिटे परतून शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही.

चांगल्या तर्‍हेने उकळ्ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे, आता कमी गॅस करून अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार आहे.

हिरवे मटर व मेथीची पाने तोडून उकळावे थंड झाल्यावर त्यास पिळून घ्यावे आता या मिश्रणात काजू ग्रेवी टाकावी. यात थोडीसी हळद, पालक, मेथी, हिरवे मटार, मलाई, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे मिसळावी.

५-१० मिनिट शिजवावे. २ चमचे क्रीम टाकावे. डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store