मेथीचे गोळे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जानेवारी २००८

मेथीचे गोळे

मेथीचे गोळे - [Methi Gole] लहान मुलांना मेथीच्या भाजीचा कंटाळा असतोच तेव्हा मेथीच्या भाजीवर जरा चविष्ट संस्कार केल्यास मुलांना मेथीची भाजी हवी हवीशी वाटेल यात शंका नाही. ‘मेथीचे गोळे’ हा पदार्थ आपण नाश्त्यामध्ये,मधल्या वेळेत किंवा जेवणात स्टार्टर म्हणून खाऊ शकतो तसेच प्रवासात/सहलीला डब्यात देण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त आहे.

जिन्नस


  • १ मध्यम आकाराची मेथीची जुडी
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • ५-६ हिरव्या मिरच्य़ा
  • थोडी कोथिंबीर
  • १/२ चमचा धणे कुटून
  • मीठ
  • हळद
  • मोहनासाठी तेल

पाककृती


मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात.

नंतर सर्व एकत्र करुन पीठ बिजवावे. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करावेत व किंचित लांबट आकार द्यावा.

नंतर कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे वाफवून घ्यावेत.

गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतावेत.

फार छान लागतात. लहान मुलांनाही फार आवडतील.