मेदुवडा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जानेवारी २००८

मेदुवडा | Medu Vada

मेदुवडा - [Medu Vada] दक्षिण भारताचा प्रसिद्ध ‘मेदुवडा’ आज सर्वत्र बनवला जातो आणि त्यासोबत खाल्ले जाणारे सांभर आणि चटणी म्हणजे तोंडाला पाणी येते.

जिन्नस


  • २ वाटी उडीद डाळ
  • १/२ वाटी हरभरा डाळ
  • १/२ वाटी तांदूळ
  • १ लहान चमचा मीठ
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ तुकडा आले
  • तेल तळण्यासाठी

पाककृती


उडीद डाळ, हराभरा डाळ व तांदूळ एका भांड्यात एकत्र १० तास भिजत ठेवा. नंतर धुऊन वाटून घ्या. मिश्रण जाडसर ठेवा. नाहीतर वडे तळायला अवघड जातील.

या मिश्रणात हिरवी मिरची, आले वाटून टाका. मीठ टाकुन व्यवस्थित एकत्र करा. हातावर थोडेसे तेल लावून मिश्रण टाका व चपटा वडा तयार करा.

त्याच्या मधोमध बोट दाबून एक खड्डा करा व गरम तेलाच्या कढईत सोडा. लाल-लाल तळून घ्या. सांभर व खोबर्‍याच्या चटणी बरोबर वाढा.