MarathiMati.com - Android App on Google Play Store

मसाले भात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

मसाले भात

मसाले भात - [Masale Bhaat] रात्रीच्या जेवणाला काय करावे? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो याप्रश्नाला उत्तर म्हणून ‘मसाले भात’ केला जाऊ शकतो आणि हा मसाले भात वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो.

जिन्नस


 • २ वाट्या तांदूळ
 • अर्धी वाटी कोणतीही भाजी - मटारदाणे, फ्लॉवरचे तुकडे, चिरलेली कोबी, वांगी, तोंडली, भोपळी मिरच्या
 • यापैकी काहीच हाताशी नसल्यास ४ कांद्याच्या चौकोनी फोडी
 • २ चमचे काजू किंवा शेंगदाणे (ऐच्छिक)
 • ३ हिरव्या मिरच्या
 • २ चमचे आमटी मसाला किंवा चमचा गरम मसाला
 • १ चमचा धनेजिरेपूड
 • पाव चमचा तिखट
 • २ मोठे चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जिरे
 • पाव चमचा हिंग
 • अर्धा चमचा हळद
 • दीड चमचा मीठ
 • ओले खोबरे
 • कोथिंबीर
 • २ चमचे साजूक तूप
 • ४॥ वाट्या गरम पाणी

पाककृती


तांदूळ धुवून तासभर बाजूला निथळत ठेवावेत. भाजी नीट करून ठेवावी. तोंडली किंवा वांगी चिरल्यानंतर पाण्यात ठेवावीत. नाहीतर रापतात (काळी पडतात).

पातेल्यात तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे उभे तुकडे घालून त्यावर भाजी घालावी. ३-४ मिनिटे परतावेत.

गरम पाणी (या भाताला गार पाणी अजिबात वापरू नये) मीठ मसाला, तिखट इत्यादी सर्व घालून साध्या कुकरमध्ये शिजवावा.

भात तयार झाला की झाकण उघडल्यानंतर दोन चमचे साजूक तूप कडेने भातावर घालावे. म्हणजे तांदळाचे दाणे मोकळे दिसतात.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store