मसाला डोसा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ जानेवारी २००८

मसाला डोसा

मसाला डोसा - [Masala Dosa] दक्षिण भारताचा प्रसिद्ध ‘मसाला डोसा’ ज्यामध्ये कार्बोहायड्रेड्स आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात आणि हा सांभर आणि चटणीसोबत खुप चविष्ट लागतो.

जिन्नस


 • १ वाटी उडीद डाळ
 • २ वाटी तांदूळ
 • २ लहान चमचे मीठ
 • १/२ किलो बटाटा
 • १/२ लहान चमचा मोहरी
 • १/२ लहान चमचा हळद पावडर
 • १/२ लहान चमचा धणे पावडर
 • १/२ लहान चमचा आमसूल पावडर
 • १/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
 • थोडीशी हिंग पावडर
 • तेल भाजण्यासाठी

पाककृती


तांदूळ व डाळ वेगवेगळे ८-१० तास भिजवून ठेवा.

नंतर दोन्ही धुऊन वेगवेगळे मिक्सरमधून काढून घ्या.

आता दोन्ही एकत्र करून चवीनुसार मीठ टाका.

हे मिश्रण १२ तास झाकून ठेऊन द्या. उन्हाळ्यात मिश्रण लवकर आंबट पडते तरी ६ तासानंतर तपासून पहा.

बटाटा उकडून चिरून घ्या. तेलात मिरीची फोडणी देऊन बटाटा व सर्व मसाले टाकून एकत्र करा.

आता एका मोठ्या चपट्या तव्यावर डोसा भाजा.

डोश्याच्या मधोमध बटाट्याचा मसाला घेऊन दुमडा व सांभर आणि खोबर्‍याच्या चटणीबरोबर वाढा.