पाककला | Maharashtrian Recipes

मसाला डाळ | Recipes

साहित्य :

१ वाटी तुरीची डाळ, २ वाट्या पाणी, ३ चमचे ओले खोबरे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मिरे, ४-५ सुक्या मिरच्या, ४ लवंगा, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ चमचा धने, मीठा, ३ चमचे तेल, १ कांदा, अर्धे लिंबू किंवा २ टोमॅटो व कैरीच्या फोडी, फोडणीचे साहित्य (मोहरी, हिंग व हळद)

 

कृती :

तव्यावर चमचाभर तेल घालून सर्व मसाल्याचे जिन्नस निरनिराळे भाजावे. एका ताटलीत काढावे. ओले खोबरे सर्वात शेवटी भाजावे. लवंगा व मिरे फुटताना उडतात व सुक्या मिरच्यांचा खकाणा उडतो. मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर थोडे पाणी घालून हे पदार्थ एकत्र वाटावेत. डाळ शिजवून घ्यावी. त्यात वाटलेले मसाला व मीठ घालावे. कांदा बारीक चिरावा व उरलेला तेलात फोडणीस टाकावा. जरा परतून डालीवर घालावा. खालीवर उतरवून लिंबाचा रस घालावा. कैरी किंवा टोमॅटो वापरायचा असल्यास डाळीबरोबरच शिजवावा.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.